आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

23

पुणे : अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता आता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघामधील मधील मृत्यूंजय मंदिरात महादेवांचे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ, मंदिरे, तीर्थक्षेत्र हे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छता ही देखील तितकीच पवित्र आहे. यामुळे माननीय मोदीजींनी याचेच महत्त्व ओळखून प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल; तरी देखील आपल्या पुजास्थळी जाऊन या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर सहकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.