पुण्यात ‘आमदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचा धडाक्यात शुभारंभ; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

6

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हेमंत रासने प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘आमदार चषक २०२६’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात शुभारंभ संपन्न झाला.

या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी हेमंत रासने यांचे अभिष्टचिंतन करून, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा पुढील काही दिवस कसब्यातील क्रीडा रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या स्पर्धेत संपूर्ण पुणे शहरातून सुमारे ९६ हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला असून, खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक ‘आमदार चषक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या आणि इतर वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठीही घसघशीत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

यावेळी नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित, नगरसेवक देवेंद्र वडके, कसबा विधानसभा समन्वयक तथा स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.