बारामतीत विजयाचा निर्धार आणि पुण्यात स्नेहबंधांचा जागर; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा झंझावाती दौरा

6

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी बारामती आणि पुणे शहराचा दौरा करून राजकीय रणनीतीचा आढावा घेण्यासोबतच सामाजिक स्नेहबंध जोपासले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

बारामती दौऱ्यात पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावडे कुटुंबियांशी संवाद साधून त्यांनी स्थानिक राजकीय व सामाजिक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, पुणे येथे मार्केट कमिटीचे माजी सभापती दिलीप आप्पा खैरे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पोटनिवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेत, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

दौऱ्याच्या उत्तरार्धात मंत्री पाटील यांनी पुण्यातील खंबीर लोकप्रतिनिधी आणि नगरसेविका रंजना नानी टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. “नानींची जनसेवेतील बांधिलकी आणि त्यांनी केलेली विकासकामे खरोखरच प्रेरणादायी आहेत,” अशा शब्दांत गौरव करत त्यांनी टिळेकर यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.