प्रत्येक घडामोडीची इतंभूत माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचिविण्यात डिजिटल माध्यमांच्या पत्रकार बांधवांची भूमिका फार मोठी आहे –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

कोल्हापूर : कोल्हापूरमधील कणेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांचे दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन 2024 चे उद्घाटन सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याच्या हस्ते संपन्न झाले. प्रत्येक घडामोडीची इतंभूत माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचिविण्यात डिजिटल माध्यमांच्या पत्रकार बांधवांची भूमिका फार मोठी आहे, त्यामुळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांनी आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या माध्यमातून डिजिटल माध्यम क्षेत्रातील नाविन्यतेबाबत चर्चा घडो, अशी सदिच्छा याप्रसंगी व्यक्त केली.

ज्यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना संघटित केले, ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एक आपली दिशा ठरवली पाहिजे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने  यांचे  कौतुक केले. त्यांनी माहिती दिली कि सरकारने साडे  बारा कोटी लोकांना पाच लाखाचा वर्षभर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा द्यायचं ठरवलं. शिक्षणाच्या बाबतीत आठ लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी सरकार भरते. सरकार सध्या मुलींची पूर्ण फी माफीसाठी देखील प्रयत्न करत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि माणसाला पूर्वी रोटी कापड आणि मकान लागायचं. पण ते दिवस गेले. माणसाला आता आरोग्य देखील लागत जे कोविड काळात आपण पाहिलं.तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण लागतं. पाटील यांनी अध्यक्ष राजा माने यांना यावेळी सांगितले कि, एक ट्रस्ट स्थापन करा. आम्ही सर्व मिळून तुमच्या ट्रस्ट मध्ये ५००० लोकांच्या मुलींचे शिक्षण, मुलींचा खेळ आणि आरोग्य या विषयामध्ये जे काही लागेल , तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची तयारी असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी एक ट्रस्ट तयार आणि आणि त्याचे एक सेंट्रल कॉर्डीनेशन करा असे पाटील यांनी यावेळी सूचित केले.
याप्रसंगी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, मिशन आयुष्यमान भारत चे प्रमुख ओमप्रकाश शेटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व सर्व डिजिटल मीडिया चे पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.