हरवलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी समतोल प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव मध्ये विशेष उपक्रम… या उपक्रमास समाजातील इतरही नागरिकांनी मदत केली पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कामासाठी कार्यकर्ता म्हणून पाटील यांनी घर सोडले, तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांना जळगाव हे कार्यक्षेत्र मिळाले मिळाले होते. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुन्या आठवणींशी ते जोडले गेले आहेत.

चंद्रकांत पाटील अभाविपचं काम करत असताना शिवाजीनगर मधील ज्या वाड्यात रहायचे, त्या वाड्याचा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात आला आहे‌. या ठिकाणी कै. हरिभाऊ तथा अन्नपूर्णा भिरुड बालभवन उभारण्यात आले आहे. या बालभावनाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पाटील यांनी माहिती दिली कि, वास्तविक, रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी समतोल प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव मध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता या उपक्रमातील मुलांना या वास्तूचा आधार मिळाला आहे. या उपक्रमास समाजातील इतरही नागरिकांनी मदत केली पाहिजे, अशी भावना पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठान चे कोषाध्यक्ष दिलीप चोपडा, समतोल प्रकल्पाचे प्रमुख राहुल पवार, डॉ. सुरेंद्र भिरुड यांच्यासह संघ परिवारातील इतर मान्यवर आणि विद्यार्थी परिषदेच्या काळातील अनेक जुने सहकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!