नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील विद्यार्थी जगाच्या नकाशावर आपले नाव कसे कोरतील याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन

जळगाव : जळगाव मधील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांच्या समवेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरणा संबंधित आपले विचार मांडले.

चंद्रकांत पाटील यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील विद्यार्थी जगाच्या नकाशावर आपले नाव कसे कोरतील याबाबत विचार स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली.
यावेळी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष आ. शिरीष चौधरी, क.ब.चौ.उ.म.वि.चे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य प्रा. अनिल राव, संस्थेचे सचिव डॉ.‌ पी. आर. चौधरी यांच्या सह उत्तर महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्था चालक आणि प्राचार्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!