नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील विद्यार्थी जगाच्या नकाशावर आपले नाव कसे कोरतील याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन
जळगाव : जळगाव मधील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांच्या समवेत नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन नवीन शैक्षणिक धोरणा संबंधित आपले विचार मांडले.