बूथ चलो अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

पुणे : आगामी निवडणुकांसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून वेगवेगळे अभियान राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या अभियानात जोमाने सहभाग घेत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या कोथरूड मतदार संघात बूथ चलो अभियाना अंतर्गत मतदारसंघातील बूथ क्रमांक ३२० आणि ३२१ मध्ये भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, भारतीय जनता पक्षाच्या बूथ चलो अभियाना अंतर्गत माझ्या कोथरुड मतदारसंघातील बूथ क्रमांक ३२० आणि ३२१ मधील डहाणूकर कॉलनीतील अजिंक्य खोत आणि लक्ष्मीनगर भागातील इरफान शेख यांची भेट घेऊन मतदार बांधवांशी संवाद साधला. दरम्यान, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची यावेळी पाटील यांनी माहिती दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!