कोल्हापूर : श्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या न्यू कॉलेजच्या शाखेच्या नवीन 11 मजली इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. याप्रसंगी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे चे सचिव तथा माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभवकाका नायकवडी, संस्थेचे अध्यक्ष के. जी.पाटील, कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे यांसह आदी मान्यवर तसेच संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.