नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे (७४) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या नागपूर येथील कोराडी येथील निवासस्थानावरून निघणार आहे. कोलार घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
प्रभावती बावनकुळे यांच्या निधनाची बातमी समजताच चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले, आमचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे (७४) यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने झालेले निधन धक्कादायक आहे. काही दिवसांपासून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. अंत्ययात्रा मंगळवारी (२ जुलै) सकाळी १० वाजता कोराडी येथील निवासस्थानाहून निघेल. कोलार घाट येथे अंत्यसंस्कार होतील.
आईचा मायेचा हात पाठीशी नसण्याचे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर बावनकुळेजींना देवो, हीच प्रार्थना. आम्ही सर्वच बावनकुळे परिवारासोबत आहोत, असे म्हणत पाटील यांनी दुःख व्यक्त केले.
Get real time updates directly on you device, subscribe now.