महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विधानसभेच्या वडागाव शेरी मतदारसंघातील महायुती कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीस उपस्थित राहिलो. लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद वाटत असल्याचे पाटील म्हणाले. या बैठकीत वडगाव शेरी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड विजयाचा संकल्प केला. या बैठकीस महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.