विकासकामांमुळे ग्रामीण जनतेचा भाजपाकडे कल – श्वेता महाले

सवना येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 

 

चिखली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व आपल्या चिखली मतदारसंघात वेगाने होत असलेले विकासकार्य यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक आदींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेचा भाजपाकडे कल वाढत असल्याचे मत बुलढाण्यातील चिखली विधानसभेच्या श्वेता महाले यांनी व्यक्त केले. चिखली तालुक्यातील सवना येथील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महाले यांनी सर्वांचे पक्षात स्वागत व सत्कार केला.

आपल्या चिखली मतदारसंघात अभूतपूर्व विकासकार्य सुरू असून माझ्या नेतृत्वात ग्रामीण भागाचा कायापालट वेगाने होत आहे. रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांसह रोजगार निर्मिती, शिक्षणाचे आधुनिकीकरण व शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय मी घेतले आहेत. याचाच परिणाम म्हणून आजचे पक्षप्रवेश झाले असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.

सवना येथे सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर कार्यकर्ते व सरपंच रवींद्र शिरसाठ यांच्यासह सर्वश्री राजू कस्तुरे, प्रदीप कस्तुरे, अशोक शिरसाठ, बाळासाहेब शिरसाठ, महेंद्र कस्तुरे, शारदा पवार, केशव शिरसाठ, पुष्पा शिरसाठ, मनोज शिरसाठ, राजू जाधव, महेंद्र भंडारे, सागर शिरसाठ, साहेबराव सुरडकर, समाधान साळवे, सत्यविजय शिरसाठ, आतिश साळवे मंगलाबाई शिरसाठ, बालूबाई शिरसाठ, विकास मिसाळ, साक्षी शिरसाठ, सुलोचनाबाई शिरसाठ, जिजाबाई शिरसाठ, इंदुबाई भंडारे, रंजना शिरसाठ, अंजली मिसाळ पूनम शिरसाठ, रूपाली शिरसाठ यांच्यासह शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजप तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शैलेश बाहेती, सुभाषआप्पा झगडे, सचिन भुतेकर, विलास चव्हाण, गजानन भुतेकर, अनुरथ भुतेकर, तालुका चिटणीस पंजाबराव हाडे, सरचिटणीस किसान मोर्चा, उमेश भुतेकर तालुका अध्यक्ष भाजपा व्ही जे एन टी सेल, कय्युम शहा तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा, सतीश भुतेकर, मंगेश काटकर तालुका चिटणीस भाजपा, ज्ञानेश्वर साळोक, सतीश शिंदे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!