भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहरात घर चलो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार

38
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २९, ३०, ३४च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहरात घर चलो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच, मतदानाच्या तारखेपर्यंत संपर्क से समर्थन वाढवले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आ. माधुरीताई मिसाळ, पुणे मतदारसंघ समन्वयक श्रीनाथ भिमाले, राजेश येनपुरे, दीपक पोटे, राजेंद्र शिळीमकर, प्रशांत दिवेकर, जितेंद्र पोळेकर यांच्यासह आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.