पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, ही आपल्या भारताला समृध्द आणि विकसीत बनविण्यासाठी टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. महाराष्ट्रात नंदुरबार , जळगाव, रावेर जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे , अहमदनगर , शिर्डी , बीड या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बांधवाना मतदानाचा हक्क वाजवण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रकांत पाटील आज स्वतः पुण्यात मतदान करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी नागरिकाना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले कि, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, ही आपल्या भारताला समृध्द आणि विकसीत बनविण्यासाठी टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तरी, माझ्या पुण्यातील बांधवांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून भारताच्या उज्जवल भविष्यासाठी मतदान करावे. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. ही जबाबदारी आहे आपणा सर्वांवर, विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेणारे सारथी निवडण्याची. आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यात प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. तरी, आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना विशेषत: युवकांना, आपली लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे . महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
१ जून पर्यंत देशात लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पडणार आहेत. तसंच ४ जूनच्या दिवशी निकाल असणार आहे. त्यामुळे आज कसं आणि किती टक्के मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे
Get real time updates directly on you device, subscribe now.