मुंबईतील घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू… जखमींना उपचारांसाठी राज्य शासन सर्वतोपरी साह्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

25

मुंबई : मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसानेही तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर भागात होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली अडकलेल्या ४७ जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, जखमींना उपचारांसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबई पोलिस, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन या यंत्रणांच्या समन्वयातून अडकलेल्यांच्या सुटकेसाठी मदतकार्य सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.