पुणे : इस्रायल-हमास संघर्षात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले,वैभव काळे यांनी भारतीय लष्करात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यात सियाचीन, ग्लेशियर, द्रास, संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचा भाग म्हणूनही ते काँगोमध्ये कार्यरत होते. ईशान्य भारतातही त्यांनी सेवा बजावली होती. पठाणकोट लष्करी तळावरील हल्ल्यावेळीही त्यांनी एका तुकडीचे नेतृत्व केले होते. या दुःखद प्रसंगी आम्ही कर्नल काळे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. वीरगती प्राप्त झालेल्या महाराष्ट्राच्या या शूरवीरला चंद्रकांत पाटील याची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Get real time updates directly on you device, subscribe now.