सर्वांना उत्तम आरोग्य आणि चांगला पाऊस पडून बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी आई तुळजाभवानीच्या चरणी चंद्रकांत पाटील यांनी केली प्रार्थना
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.