पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस . दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही एक वेगळा उपक्रम राबविण्याचे पाटील यांनी ठरवले आहे. याची सुरवात त्यांनी कालपासून केली देखील. आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभरात महाराष्ट्रभर ६५ हजार झाडे लावण्याचा संकल्प पाटील यांनी केला आहे. काल कोथरूडमधील म्हातोबा टेकडी येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर आज कसबा विधानसभा मतदारसंघ, शनिवार पेठ, वर्तक बाग आणि सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, दैनंदिन आयुष्यात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण रक्षणाबरोबरच हवेतील प्रदूषण कमी करण्यातही झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभरात महाराष्ट्रभर ६५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. काल कोथरूडमधील म्हातोबा टेकडी येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर आज पाटील यांनी सपत्नीक कसबा विधानसभा मतदारसंघ, शनिवार पेठ, वर्तक बाग आणि सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यानात वृक्षरोपण करून उपस्थितांना रोपांचे वाटपही करण्यात आले.
या प्रसंगी कसबा मतदारसंघातील निवडणूक प्रमुख हेमंत रासने, मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्रभाऊ काकडे, माजी नगरसेवक, शहरातील पदाधिकारी, कसबा मतदारसंघातील सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.