पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपल्या कृतिशील नेतृत्वात महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत बुलंद करतील – चंद्रकांत पाटील

8
पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड होणे ही बाब समस्त पुणेकरांसाठी ऊर अभिमानाने भरून आणणारी आहे. या नवीन जबाबदारासाठी मुरलीधर मोहोळ यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेल्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे देखील त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी मोहोळ यांना शुभेच्छा देताना म्हटले कि, कार्यकर्ता ते आज केंद्रीय राज्यमंत्री असा त्यांनी गाठलेला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मोहोळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपल्या कृतिशील नेतृत्वात महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत बुलंद करतील, हा विश्वास वाटत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पाटील म्हणाले कि, केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेल्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! देशातील जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असून मिळालेली ही जबाबदारी आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल असा ठाम विश्वास वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत देशवासीयांना अभिप्रेत असलेले विकासकार्य आपल्या हातून घडावे ही सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.