मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला तन-मन-धनाने माझा जाहीर पाठिंबा; खासदार संजय जाधव

80

परभणी : मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून पासून पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले असून त्यांच्या उपोषणाला अनेक राज्यकर्ते पाठिंबा दर्शवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी देखील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून राज्यपाल यांना देखील पत्र लिहिले आहे.

संजय जाधव म्हणतात मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांना मी माझा जाहीर पाठिंबा घोषित करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. एक मराठा मावळा व मराठा आरक्षणाची राजधानी म्हणून पुढे आलेल्या आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी आहे, त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून आरक्षणाच्या या आंदोलनाला मी तन-मन-धनाने माझा जाहीर पाठिंबा घोषित करत असल्याचे म्हंटले आहे.

महामहिम राज्यपाल महोदय यांनाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत गंभीर सूचना देणारे पत्र त्यांनी जारी केले असून मनोजदादांची तब्येत खालावण्या अगोदरच ताबडतोब आमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची विनंतीही जाधव यांनी पत्रात केली आहे.

https://x.com/SanjayJadhavPbn/status/1800815407160537402/photo/1

 

Image

Get real time updates directly on you device, subscribe now.