खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ खा. ओमराजे निंबाळकर हे नायगांव पाडोळी येथे गेले असता अजिंक्य टेकाळे नावाचा तरुण समोर आला. त्याने ओमराजेच्या हातात हात देवून नमस्कार केला आणि जवळचा चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ओमराजे निंबाळकर यांचे घड्याळ तुटले असून हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर हा तरुण तातडीने फरार झाला आहे.

खा.ओमराजे निंबाळकर यांचे आवाहन “मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे .माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे .सुदैवाने जखम खोल नाही . शिवसेना, भाजपा आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे की शांतता राखावी. आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे , प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत , अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही.”