सोलापूर : सोलापुरातील आई फाउंडेशन आणि पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए. आर. बिर्ला महिला महाविद्यालयातील मुलींनी लेकींसाठी उच्चशिक्षण मोफत करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत सन्मानाचा नम्रपणे स्वीकार केला.
महाराष्ट्रातील लेकी उच्च विद्याविभूषित झाल्या पाहिजेत, असा चंद्रकांत पाटील यांचा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळेच राज्याचा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री म्हणून काम करताना लेकींसाठी उच्चशिक्षण मोफत करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. या निर्णयाचा भाग असल्याचा मला आनंद वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. याच निमित्ताने आज सोलापुरातील आई फाउंडेशन आणि पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए. आर. बिर्ला महिला महाविद्यालयातील मुलींनी या निर्णयाचे स्वागत आणि पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता.
मुलींच्या शिक्षणामुळे समाज आणि देश प्रगती करतो, असा माझा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. यासाठीच राज्यातील माझ्या लेकींना आवाहन करतो की, खूप शिका, मोठे व्हा, प्रगती करा… उच्चशिक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही प्रगतीला गती द्या, असे पाटील यांनी म्हटले.
Get real time updates directly on you device, subscribe now.