मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर… सर्वसमावेशक, विकासाभिमुख तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

88
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या विकासरथाला अधिक बळकटी देणारा 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. यात गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्या उत्थानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देशातील सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुगती प्राप्त होईल, भारत सर्व क्षेत्रात निश्चितच अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो. सर्वसमावेशक, विकासाभिमुख तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारमण यांना धन्यवाद, असे पाटील यांनी म्हटले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा ३.० चा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक क्षेत्रातील तरतूद जाहीर केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे. महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण, याच्यासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.