महाडमध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांचा स्नेहल जगताप यांना धक्का, स्व. माणिक जगतापांच्या भावाने सोडली साथ

86

महाड : महाडमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांना आमदार भरतशेठ गोगावले यांनी आता दुसरा जोरदार धक्का दिला आहे. नुकताच महाडमध्ये किंजलघर नवनाथ वाडी चा प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करण्यात आला, आणि आता स्नेहल जगताप यांचे जवळचे नातेवाईक , माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे मामेभाऊ प्रवीण भिकाराम सर्कले यांनी विधानसभेच्या निवडणुकी पूर्वीच जगताप कुटुंबियांची साथ सोडून शिवसेनेला मदतीचा हात दिला आहे. प्रवीण सर्कले हे संतोषी गावचे माजी सरपंच त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बिरवाडी विभागाचे सहसंपर्कप्रमुख आहेत त्यामुळे हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जातोय. महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार, विधिमंडळ पक्ष प्रतोद,उपनेते भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला.

प्रवीण सर्कले हे स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे मामेभाऊ आहेत, सध्या ठाकरे गटाकडून विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहल माणिकराव जगताप कामत या विधानसभेच्या उमेदवार आहेत आणि विधानसभा ही तोंडावर येऊन ठेपली आहे. अशा वेळीच जगताप कुटुंबीयांच्या मूळ गावातील आणि घरचे नातेवाईक जगताप कुटुंबीयांची साथ सोडत असल्याने हा एक जगताप कुटुंबांसाठी धक्का मानला जात आहे. या संदर्भात बोलत असताना प्रवीण सरकले यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली असून माझ्या वडिलांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांना राजकारणात आणले आणि मोठे केले, मात्र वडिलांनंतर आमच्याकडे जगताप कुटुंबीयांनी दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली असून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण सर्कले यांच्याबरोबर माजी सरपंच चंद्रकांत जयराम सर्कले, अशोक गोविंदराव सर्कले, अरुण रामचंद्र सर्कले, दीपक भिकाराम मोरे, पार्थ अशोक सर्कले, ओम प्रवीण सर्कले, अनिल रामचंद्र सर्कले, सुनील रामचंद्र सर्कले, रामचंद्र भाऊराव सर्कले, कल्पेश भिकाराम सर्कले, प्रभाकर चंद्रकांत सर्कले, अशोक चंद्रकांत सर्कले, अनिकेत रामचंद्र सर्कले, खंडेराव सिताराम सर्कले, संदीप बळीराम सर्कले, शरद सखाराम सर्कले, गोविंदराव दौलत सर्कले, तर वाघोली मधून सुरेश बाळकृष्ण मोरे, अनंत लक्ष्मण मोरे, विनोद बळीराम मोरे, तुलसीराम कृष्णा शेडगे,दिलीप तानाजी जाधव, रवींद्र काशीराम पवार, रवींद्र राण्या पवार, समीर राण्या पवार , आकाश कालू पवार, परशुराम काल्या काटकर इत्यादी तर पंदेरी गावातून शिवाजी दगडू शिंदे, सुरेश शिवाजी शिंदे,प्रकाश शिवाजी शिंदे,नितीन भिकाजी शिंदे, माजी सरपंच लक्ष्मी शिवाजी शिंदे, कांता सुरेश शिंदे, शितल सुरेश शिंदे, शितल प्रकाश शिंदे,सविता भिकाजी शिंदे, अपर्णा नितीन शिंदे, सपना सुरेश शिंदे इत्यादींनी शिवसेना महाड तालुका संपर्कप्रमुख संजय शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना दक्षिण रायगड संपर्कप्रमुख विजय आप्पा सावंत, महाड विधानसभा संपर्कप्रमुख राजेश देशमुख, शिवसेना महाड तालुकाप्रमुख बंधू तरडे, महाड तालुका संपर्कप्रमुख संजय शेठ शिंदे,माझी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष गायकवाड, युवासेना महाड तालुका सरचिटणीस शेखर राखाडे, सुहास उर्फ भाऊ दिविलकर, मनोहर कालगुडे,अशोक शिंदे, प्रफुल कालगुडे, जितेंद्र शेडगे,सचिन मोरे,प्रभाकर मोरे, विभाग प्रमुख भगवान पवार, शरद पोटे, अमर जंगम,अनिल पवार, राकेश घाग, लौकिक शिंदे, बालकृष्ण जाधव,गणेश पवार, सुरेश आखाडे, आकाश हिरवे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.