आतापर्यंतच्या २३ वर्षांप्रमाणे भविष्यातही मोदीजीनी सर्वांना असेच प्रेरणादायी मार्गदर्शन करावे, देशाला विकासपथावर नेण्यात योगदान द्यावे – चंद्रकांत पाटील
पुणे : आज देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान, कणखर नेतृत्व, प्रेरणादायी नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एखाद्या घटनात्मक यंत्रणेचा प्रमुख म्हणून २३ वर्षे पूर्ण केली. प्रचंड कष्ट, जनतेप्रती आणि देशाप्रती निष्ठा, निष्कलंक कारकीर्द आणि विकासाची आस ही या २३ वर्षांची वैशिष्ट्ये आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून एक छोटा डाग सुद्धा आपल्या कारकिर्दीला लागू दिलेला नाही. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचे कौतुक केले आहे.
मोदीजींच्या कार्याचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली आहे. शिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि विज्ञान या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याचे मोदीजींचे कार्य अजोड आहे. त्यांच्या दृढ संकल्पामुळे भारतीयांचे जीवनमान उंचावले असून देश विकसित भारताच्या दिशेने आगेकूच करत आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी खऱ्या अर्थाने एका समर्थ, स्वयंपूर्ण, आत्मविश्वासपूर्ण, आश्वासक देशाची पायाभरणी केली आहे. आतापर्यंतच्या २३ वर्षांप्रमाणे भविष्यातही मोदीजीनी सर्वांना असेच प्रेरणादायी मार्गदर्शन करावे, देशाला विकासपथावर नेण्यात योगदान द्यावे, अशी अपेक्षा आज पाटील यांनी व्यक्त केली.