उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

13

पुणे : मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, सिद्धार्थ शिरोळे थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे तसेच थिएटर अकॅडमी व महाराष्ट्रीय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या इमारतीच्या कामासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये कलाकारांसाठी राहण्याची व्यवस्था, सरावासाठी सभागृह, बहुउद्देशीय हॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था १०० वर्षांपासून तर थिएटर अकॅडमी ५० वर्षापासून कार्यरत आहे.

मुकुंदनगर येथील थिएटर अकॅडमी ही संस्था बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभलेली संस्था आहे. महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या मुलांकरीता मोलाचे कार्य करत आहे. या संस्थांच्या कार्यासाठी शासन पाठीशी आहे, असे  शिंदे म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थिएटर अकॅडमीची पाहणी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.