पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठानद्वारे संचालित बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन

पुणे : आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठानद्वारे संचालित बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे भूमिपूजन रा. स्व. संघाचे पूर्व सरकार्यवाह तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठानचे मानद अध्यक्ष तथा रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी, सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदरजी पुनावाला तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी , आपल्या देशाने या जगातील अनेक देशांना जगवलं, वाचवलं , व्हॅक्सीन दिल, असे अद्भुत काम करणारे, अनेक व्हॅक्सीन त्यांनी शोधले , स्वदेशी व्हॅक्सिन शोधण्याचे मोठं काम केले यासाठी प्रथम अदर पुनावाला यांचे आभार मानले.

कोविडच्या काळात , मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी नव्याने कळल्या, या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागल्या. हे सगळं करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण अनेक देशांना एक्स्पोर्ट करू लागलो. एखादे संकट येत ते भविष्यासाठी वरदान ठरत. कोविड मध्ये माणसाच्या हे लक्षात आलं कि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाला क्षणभंगुरता कळली, असे . त्या दृष्टीने हे हॉस्पिटल होणं गरजेचं असल्याचे पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले कि, कोविडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी केल्या. यासाठी फिरत रुग्णालय सुरु केले. एक वर्षानंतर कोथरुडमध्ये दिवसातून दोन थांबे उभे असतात त्यावेळी तेथे लोक रांगेत उभी असतात. सगळ्या शहरांमध्ये अशा सेवांची मोठी आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले.

पाटील यांनी पुढे सांगितले कि, एमएनजीएलने एक सुविधा दिली आहे ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या सगळ्या सुविधा आहेत. यामध्ये अतिशय उत्तम सुविधा आहे. ती गाडी आता शहरामध्ये फिरत आहे. लोक त्याच बुकिंग देखील करत आहेत. अशा प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने मोठी आवश्यकता असल्याने या हॉस्पिटलचे खूप महत्व असल्याचे पाटील यांनी म्हटले.

यावेळी रा. स्व. संघाचे नानासाहेब जाधव, रवींद्र वंजारवाडकर, प्रसिद्ध अभिनेते निर्माता आणि दिग्दर्शक नितीश भारद्वाज, सुहास हिरेमठ, महेश करपे, सिसकाचे राजेश उत्तमचंदानी, डॉ. प्रवीण दबडगाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.