पहलगाम दहशतवादी हल्ला : पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

201

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी काल जम्मू काश्मीर येथे असलेल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला. हल्ला करताना मुस्लिम आहात का? अशी विचारणा करून टार्गेटेड पद्धतीने हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. येथे फिरायला गेलेले अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुखरूप आगमनासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील पर्यटकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून आपल्या परिचयातील कुणी अडकले असल्यास हेल्पलाईनशी संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

दि. 22.04.2025 रोजी पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे पर्यटकांवर हल्ला झाला असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील काही पर्यटक अडकले आहे. जर सदर ठिकाणी पुणे जिल्ह्यातील व्यक्ती (पर्यटक) अडकले असल्यास त्यांचे संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दिनांक 22/04/2025 रोजी पासून जिल्हा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे अडकलेल्या 84 व्यक्तींनी (पर्यटक) या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आहे.

प्राप्त झालेल्या 84 व्यक्तींची (पर्यटक) माहिती राज्य आपत्ती नियंत्रण केंद्र, मंत्रालय यास पाठविण्यात आली आहे. सदर नियंत्रण कक्षाचा संपर्क क्र. खालीलप्रमाणे : हेल्पलाईन / संपर्क क्रमांक 020-26123371 नियंत्रण कक्ष: 9370960061

Get real time updates directly on you device, subscribe now.