मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) येथे सुरू करण्यात आलेल्या विक्री केंद्राचे लोकार्पण संपन्न

12

कोल्हापूर : गरीब व गरजू रुग्णांना तातडीने आवश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या विक्री केंद्राचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमामुळे कोल्हापूरसह ग्रामीण भागातून उपचारांसाठी CPR मध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आवश्यक वस्तू अर्ध्या किंमतीत सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि उपचार प्रक्रियेत सुलभता येईल, असे पाटील यांनी म्हटले.

यामध्ये साबण, पेस्ट, सॅनिटायझर यासारख्या वस्तू सवलतीच्या दारात नागरिकांना उपलब्ध करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून हा स्तुत्य उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.