मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील भाजपा पदाधिकऱ्यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे घेतले दर्शन

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील भाजप पदाधिकारी तसेच कोल्हापुरातील उद्योजक मंडळींच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले.
कोल्हापूरमधील प्रख्यात उद्योजक श्री. एस. एम. घाटगे, भाजप नेते योगेश ओटावकर व राजू मोरे, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेशजी क्षीरसागर, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप पदाधिकारी जय गवळी, सचिन पोवार, भाजपा महिला पदाधिकारी सुनीता सुर्यवंशी आणि अमर साठे, शैलेश पाटील व किरण अतिग्रे यांच्या घरी विराजमान गणपतींचे यावेळी पाटील यांनी दर्शन घेत मनोभावे पूजा केली.
सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी गणरायाच्या चरणी चंद्रकांत पाटील यांनी प्रार्थना अर्पण केली. सर्वांच्या कुटुंबियांचे प्रेम आणि आदरातिथ्य पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.