महिलांच्या स्वावलंबनासाठी कर्वेनगरमध्ये ‘महा ई-सेवा केंद्र’ कार्यान्वित; जिव्हाळा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्वेनगर येथील ‘जिव्हाळा फाउंडेशन’च्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधला आणि त्यांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने येथे ‘महा ई-सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. महिलांचे आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन हेच आमचे ध्येय आहे. जिव्हाळा फाउंडेशनचा हा उपक्रम परिसरातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे कर्वेनगर परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांनी या विधायक कार्याचे स्वागत केले आहे.