लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून काम करण्यास अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – चंद्रकांत पाटील

14
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. रविवारी पुणे दौऱ्यावर असताना पाटील यांनी कोथरूड जनसंपर्क कार्यालयात भेट दिली आणि मोफत सुरु असलेल्या महा ई सेवा केंद्राचा कोथरूडकरांना कसा लाभ होत याची पाहणी केली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, कोथरूडकरांच्या समस्या सोडविण्यासाठी माझं जनसंपर्क कार्यालय नेहमीच कार्यतत्पर असते. शैक्षणिक तथा इतर कामांसाठी अत्यावश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले कोथरूडकरांना सहज उपलब्ध व्हावेत यासाठी मोफत महा ई-सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या महा ई-सेवा केंद्राचा कोथरुडकरांना मोठा लाभ होत आहे. दरम्यान यापैकी काही नागरिकांचे विविध प्रकारचे दाखले तयार झाले असून, पाटील यांनी त्या लाभार्थ्यांना त्यांचे दाखले वितरित केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून काम करण्यास अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.