कोथरुड कर्वेनगर भागातील धान्याच्या दुकानाला चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट; नागरिकांना शिधा आणि मिठाई वाटप करून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

27
पुणे : राज्यातील प्रत्येक नागरिकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. कोथरूड मध्येही धान्याच्या दुकानात शिधा वाटप करण्यात येत आहे. शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी हजेरी लावत सर्वांना मिठाईचे वाटप केले.
शासनाच्या आदेशानुसार १ किलोग्राम साखर, १ लिटर खाद्यतेल, अर्धा किलोग्रॅम चणाडाळ, अर्धा किलोग्रॅम रवा यांच्याबरोबरच आता अर्धा किलोग्रॅम पोहे आणि अर्धा किलोग्रॅम मैदा या जिन्नसांचा समावेश करण्यात आला आहे. कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर भागातील धान्याच्या दुकानात हे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील भेट देऊन शिधा वाटप केले.
यावेळी माजी नगरसेवक सुशील मेंगडे, विठ्ठल बराटे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सर्वांना मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.