सुरत-बारडोलीजवळ महाराष्ट्र पासिंगच्या बसेसचा भीषण अपघात; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली

8

गुजरात : गुजरातमधील बारडोली (सूरत) जवळ महाराष्ट्र पासिंगच्या दोन बसेसचा भीषण अपघात होऊन निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रवाशांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आम्ही शोकाकुल परिवारांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, या दुर्घटनेनंतर केंद्र व राज्य शासनाने तातडीने मदत जाहीर केली असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून जखमी प्रवाशांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ईश्वर मृतांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. तसेच या अपघातातील जखमी प्रवाशांना योग्य उपचार मिळून ते लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हणत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्या. अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली. या अपघातात एका बसचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर दुसरी बसही थेट पलटी झाली. यामुळे अनेकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.