विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला आणि सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व व्यवस्था अधिक तत्पर आणि दर्जेदार करण्यावर भर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

6

मुंबई : मंत्रालयात मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस आणि नरिमन पॉईंट येथील मुलींच्या वसतीगृहातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत विद्यार्थिनींच्या वसतीगृहात स्वच्छ व नियमित पिण्याचे पाणी पुरवणे आणि कलिना कॅम्पसमधील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला आणि सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व व्यवस्था अधिक तत्पर आणि दर्जेदार करण्यावर भर देण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिल परब, आमदार मनीषा कायंदे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार शेखर निकम, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक रुपेश राऊत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद करंडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.