उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वार्षिक अहवालास मान्यता

4

मुंबई : मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ४७ व्या नियामक परिषदेची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीत मंडळाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वार्षिक अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातील विविध बाबींचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.