विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणे आणि उच्च शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

मुंबई, १४ ऑक्टोबर : राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सह्याद्री अतिथिगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा शुल्क, पेपरफुटी रोखणे, शैक्षणिक वेळापत्रक आणि विद्यार्थी हिताच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. यापूर्वी शुल्क घेतले असल्यास ते परत करावे. विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केल्याचे आढळल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

तसेच, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणे आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील पाटील यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणे आणि उच्च शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम करणे, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.