‘बुडत्या नावेत कोण बसणार?’ – फडणवीस

1

नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलाय. परंतु, ‘राणे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. ते दिल्लीत बोलत होते. राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार करतानाच ‘बुडत्या नावेत कोण बसणार?’ असा टोलाही फडणवीसांनी काँग्रेसला लगावलाय. दरम्यान, नारायण राणेही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. दिल्लीत ते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. परंतु, यावेळी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यास मात्र नारायण राणेंनी नकार दिला.