रुग्णांची व्यथा रोखण्यासाठी, अमित ठाकरेंनी शासनाला सुचविला उपाय

1

महाराष्ट्रात कोरोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता माहित नसल्यामुळे नागरिकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे, तरी त्यांची ही व्यथा रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी एक उपाय महाराष्ट्र शासनाला सुचविला आहे.

या मध्ये अमित ठाकरे यांनी शासनाला एक मोबाईल ऍप्लीकेशन बनविण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार चालू रुग्णालये आणि कोरोना सोडून इतर आजारांवर इलाज करणारी रुग्णालये आणि त्यांतील बेड्ची उपलब्धता या मोबाईल ऍप्लीकेशन मध्ये असेल, जेणे करून आजारी रुग्णांना कोणत्या रुग्णालयात दाखल व्हावे हि माहिती मिळेल आणि त्याचा व कुटुंबियांचा त्रास कमी होईल.

अमित ठाकरे यांनी या संबंधी महाराष्ट्राचे मुख्मंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबई महानगरपालिका पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पत्र पाठविले आहे..