माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून… हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर बांधू – राज ठाकरेंचा इशारा

मनसेचा गुढीपाडवा मेळावा बुधवारी पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर  भाष्य केले. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लक्ष्य केले. ते म्हणाले कि, एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला असून उद्योगही राज्याबाहेर जात आहेत. बेरोजगारी वाढत आहे, अशा परिस्थितीत जनता सरकारकडे आशेने बघत असताना सरकार न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. न्यायालयावर अवलंबून असणारे सरकार चालवण्यापेक्षा विधानसभेच्या मध्यावधी निडणूका घ्या आणि राजकीय अस्थिरतेचा सोक्षमोक्ष लावा अशी थेट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावर राज पुन्हा आक्रमक झाले. मशिदींवरील भोंगे महिनाभरात हटवावेत अन्यथा पुन्हा अंदोलन छेडण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच माहीम येथील समुद्रात उभे राहत असलेल्या दर्ग्यावर महिनाभरात कारवाई झाली नाही तर भव्य गणपती मंदिर उभारू असा इशाराही राज यांनी दिला. महाराष्ट्रात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. आपण समाज म्हणून अशा गोष्टींकडे पाहत नाहीत. तुमच्या भागांमध्ये तुमचं लक्ष्य असले पाहिजे. या मुसलमानांना मला विचारायचं कि जे मी दाखवतोय हे तुम्हाला मान्य आहे का ?, असा सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवला.
या व्हिडिओमध्ये माहीमच्या समोरच्या समुद्रात तिथे एक अनधिकृत बांधकाम दिसून येते आहे. व्हिडीओवरून ते बांधकाम म्हणजे कुणाचीतरी समाधी आहे असे ठाकरेंनी या गोष्टीवर तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे. इथे मकदूम बाबाचा दर्गा आहे. त्याच्यासमोर समुद्रात अनधिकृत रित्या उभ्या असलेल्या त्याचे सॅटेलाईट फोटो मी पहिले आहेत. तिथे काहीही नव्हतं. मोहननगर पालिकेचे लोक फिरत असतात. अन त्यांनी पहिले डोळ्यांसमोर समुद्रात नवीन हाजीअली तयार करत आहेत. असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे पुढे म्हणाले कि, आजवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे ऐकत होतो, पण महाराष्ट्र लुटून अलीबाबा आणीन ४० जण सुटला गेल्याचे प्रथमच घडत आहे. असा टोला शिंदेंना लगावला.
उद्धव ठाकरे यांना लक्ष करत राज ठाकरे म्हणाले कि, शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आपल्यावर अन्याय कसा झाला हे राज्यभर सांगत फिरत आहेत. कोरोनाकाळात ते आमदारांना भेटत नव्हते. ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात जे पेरले , अनेकांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी जी कटकारस्थान केली, त्याचाच हा परिपाक असल्याचे राज ठाकरे यांनी  सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे याच्यासोबत झालेल्या  बैठकीचा उल्लेख त्यांनी केला. पक्षांतर्गत वाद मिटल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसमोर न येता हा वाद तसाच ठेवत माझया बदनामीची मोहीम राबविली.