विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक, राज ठाकरेंचे महिलादिनी आवाहन

आज जागतिक महिला दिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. महिलांच्या विकासासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. राजकारणातही महिलांचा सहभाग वाढत आहे. आज महिला दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत समस्त महिला वर्गाला आवाहन केले आहे.

म्हणूनच स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या या पत्रात नमूद केले आहे.