औरंगाबादमध्ये रुळांवर झोपलेल्या मजुरांना मालगाडीने चिरडले; १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

27 545

पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

औरंगाबादमध्ये मजुरांना मालगाडीने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मजुरांमध्ये १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्यीची माहिती मिळत आहे. या अपघातात चार मजूर बचावले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. औरंगाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-जालना मार्गावर करमाडजवळ पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. औरंगाबाद-जालनादरम्यान हे सर्व मजूर रुळांवर झोपले होते. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.