तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद: राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच संतापले आहेत. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवावं, असा थेट इशाराच इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. यासोबतच ज्या अधिकाऱ्यांनी परिपत्रकात औरंबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केला त्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेकडून नेहमीच औरंगाबदाचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. तर काँग्रेसचाही संभाजीनगर नावाला विरोध आहे. शहराचं केवळ नाव बदलून काही शहराचा विकास होत नाही. खरंतर नामांतराऐवजी औरंगाबादमधील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं थेट आव्हान जलील यांनी दिलं आहे.

Read Also :