बीड: बारामती आली धावून

13

दुष्काळाच्या आगीत होरपळत असलेल्या बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब धावून आले आहेत. पवार साहेबांच्या शब्दानुसार ४० हजार लिटर क्षमतेच्या २१ पाण्याचे टँकर बारामती एग्रीकल्चर डेव्हेलपमेंट ट्रस्ट मार्फत बीड जिल्ह्यात दाखल झाले. 

रोहित राजेंद्र पवार यांच्या हस्ते आज या पाण्याच्या टॅंकरचे लोकार्पण झाले. सुमारे १० लाख लिटर क्षमतेचे हे टँकर जिल्ह्यातील शंभर गावांत पाण्याचा पुरवठा करतील. आणखी नऊ टँकर लवकरच दाखल होणार आहेत. बीड जिल्ह्यातील जनतेची तहान भागविण्यासाठी सरकारला तर जाग आली नाही मात्र बारामती धावून आली आहे.