वसई-विरार महापालिका कचरा व्यवस्थापन विभागातील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करा – मनसे शहर सचिव महेश कदम

1

प्रतिनिधी

विरार : वसई-विरार महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराची चौकशी करून; यातील टक्केवारी मोडीत काढ़ावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव महेश कदम यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांना दिले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या २२ झोनमधील कचरा उचलण्याचा ठेका विविध कंत्राटदारांकड़े आहे. शहरातून निघणारा मोठ्या प्रमाणातील कचरा गोखिवरे येथे नेला जातो; मात्र महापालिकेकड़े क्षेपणभूमी नसल्याने या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

ओला व सुका कचरा वेगळा असावा, अशा सूचना असतानाही ठेकेदार हे नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. चिकन शॉप-मटण शॉपमधून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट महापालिका कशी लावते, याबाबतही साशंकता आहे.

या सगळ्यात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टक्केवारी असल्यानेच महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागात भ्रष्टाचार पोसला जात असल्याकड़े महेश कदम यांनी या निवेदनातून आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान; वसई-विरार महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसई-विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळणारा अनावश्यक वाहन भत्ता बंद केला आहे. याशिवाय आरोग्य विभागातील अनेक कामचुकार अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे वसई-विरारकरांनी आयुक्तांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!