शिवसेनेची खास ‘गटारी ऑफर’

विरार :  राजकीय पक्ष कोणत्या न कोणत्या पद्धतीने जनेतला आकर्षित करण्याची संधी पाहत असतात आणि अशीच एक वेगळी ऑफर विरार शिवसेनेकडून गटारी निमित्त देण्यात आली आहे. विरारमध्ये शिवसेनेने चक्क गटारी अमवस्येदिवशी एक किलो चिकन अल्प दरात  वाटप करण्याचा बॅनरचा लावला आहे.

येत्या रविवारी गटारी अमावास्या आहे. या दिवशी विरार-साईनाथ नगर शाखेच्या वतीने एक किलो चिकनअल्प दरात  वाटप करण्यात येणार आल्याचे बॅनर लावले असून त्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. रविवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत या संधीचा लाभ घेता येणारआहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या या बॅनरवर  चिकनचा दर (१८०) रुपये जाहीर केला असून; प्रति व्यक्ती एक किलो चिकन अल्प दरात  देणार असल्याचे म्हटले आहे. बाजारात सध्या चिकनचा दर 230 ते 240 रुपये आहे.

राजकारणी  प्रसिद्धीसाठी कोणत्याही दिवसाचा वापर आपल्या फायद्यासाठी करू शकतात हे यातून सिद्ध होत आहे. यापूर्वीही शिवसेनेने १ रूपात पेट्रोल वाटप ठेवले होते. शिवसेनेकडून प्रसिद्धीसाठी अशाप्रकारे  निरनिराळी  शक्कल लढवली जाते, आणि आता गटारी अमावस्येचे निमित्त म्हणून हि चिकन ऑफर ठेवून नागरिकांना खुश करण्याचा अनोखा प्रयत्न हे राजकारणी करत असल्याचे येथे दिसून येते.