• Likes
  • Followers
  • Followers
  • Thursday, May 19, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर का टांगताय, सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का?

महाराष्ट्रराजकीय
On Sep 22, 2021
Share

मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील ‘पत्र’वार झाल्यानंतर भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून राज्यातील महिलांवरील अत्याचाऱ्याच्या मुद्द्याकडे लक्ष्य वेधण्यात आलं असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

मा. उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री

महोदय,

आता कोरोनाचे निर्बंध बरेचसे शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहात असल्यानं आपणही मंत्रालयातील कार्यालयात रुजू झाला असाल, या अपेक्षेनं आम्ही महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकी आपणास हे पत्र मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवत आहोत. राज्याची कायदा सुव्यवस्था, महिलांची आणि एकूणच जनतेची सुरक्षा हा संपूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असतो; हे आपणास माहित आहे. माननीय राज्यपाल महोदयांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख आपण केल्याचं आढळतं. परंतु, कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय राज्याच्या गृहखात्याशी संबंधित असल्यानं मुख्यमंत्री कार्यालयाशी त्याचा संबंध नाही असे आपण अन्य एका संदर्भात स्पष्ट केल्याचा उल्लेख गृहखात्याने केल्याच्या बातम्या प्रसृत झाल्यामुळे तसेच राज्यात रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत आणि दिवसागणिक महिलांवर सुरू असलेल्या तालिबानी अत्याचारांबाबत आपणास वा आपल्या कार्यालयास त्याची नेमकी कल्पना असेल किंवा नाही याबाबत आम्ही साशंकच आहोत.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली आपण माननीय राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून दिली असली, तरी साकीनाक्यातील त्या दुर्दैवी पाशवी अत्याचारानंतरही मुंबईपलीकडेदेखील असलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असं दिसते. परभणीमध्ये एका अल्पवयीन कन्येवर सामूहिक पाशवी बलात्कार झाला आणि त्यानंतर या लेकीने अत्यंत वैफल्यग्रस्त होऊन विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले, हे गृहखात्यामार्फत आपल्या कार्यालयास कळविले गेले असेलच.

आपण म्हणता त्याप्रमाणे अशी गुन्हेगारी काही एकट्या महाराष्ट्रात नाही. अन्य राज्यांतही ती आहे. पण आपण त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा अभिमान बाळगावा, अशी ही स्थिती खचितच नाही. नापासांच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा पळपुटेपणा पुन्हा अशा प्रकरणांतही दाखवावा ही आम्हा शिवरायांच्या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींसाठी लाजिरवाणी बाब आहे. देशाच्या अन्य राज्यांतही गुन्हेगारी आहे, हे आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही हे आम्ही आपणास हतबलपणे निदर्शनास आणून देत आहोत.

महोदय, आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व दाखविले आहे. आता राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना व दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात असतानादेखील आपण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात हे आम्हा सावित्रीच्या लेकींसाठी अनाकलनीय आहे.

राज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा आदर्श ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्रीसन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही व्यथित आहोत.

महोदय, अन्य राज्यांतील गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. या गुन्हेगारीस कठोर पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारनेच पावले उचलावयास हवीत. त्याकरिता, गृहखात्याच्या अखत्यारीतील अशा घटनांची मुख्यमंत्री या नात्याने दखल घेणे हे आपले कर्तव्य ठरते.

केंद्र सरकारला अधिवेशन आयोजित करण्याबद्दल सांगण्याऐवजी महाराष्ट्रातील या लज्जास्पद घटनांचे पाढे संसदेत वाचले जावेत अशी अपेक्षादेखील न करता, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून आपण ठोस कृती करून महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावयास हवी, अशी आम्हा त्रस्त महिलांची मागणी आहे.

केवळ अधिकारी स्तरांवर बैठका घेऊन आणि आदेशांचे कागदी घोडे नाचवून कायदा सुव्यवस्था स्थिती राखण्याचे आपले प्रयत्न फोल आहेत. त्याकरिता सुरक्षा दलांना दबावमुक्त वातावरणात त्यांचे कर्तव्य बजावण्याची मुभा देणे आवश्यक आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालून पीडित महिलांचीच उपेक्षा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी केवळ आपल्या खात्याच्या अखत्यारीतील घटना नाही असे लंगडे युक्तिवाद करून स्वतःचा बचाव करण्यामुळेच गुन्हेगारीस खतपाणी मिळत आहे, हेही आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

राज्यपाल महोदयांना उत्तर देऊन आपण राज्यातील अत्याचारपीडित महिलांच्या वेदनेची थट्टा उडविली आहे, अशी आमची भावना आहे. केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी आपणास टाळता येणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्रातील भयग्रस्त महिलावर्गाच्या वतीने आम्ही देत आहोत. आपण योग्य ती दखल घ्याल व राज्यातील अनागोंदीचे लंगडे समर्थन तरी थांबवाल, अशी अपेक्षा आहे.

कळावे,

आपल्या,

अन्यायग्रस्त महाराष्ट्रातील हतबल सावित्रीच्या लेकी –

आ.माधुरी मिसाळ,

आ.विद्या ठाकूर,

आ.प्रा.देवयानी फरांदे

आ.मनिषा चौधरी,

आ.सीमा हिरे,

आ.श्वेता महाले पाटील

आ.मेघना साकोरे बोर्डीकर,

आ.डॉ.नमिता मुंदडा,

आ.मंदा म्हात्रे,

आ.भारती लव्हेकर ,

आ.मोनिका राजाळे,

आ.मुक्ता टिळक

Chief MinisterGovernment of MaharashtraLatest NewsMaharashtra governor and Uddhav Thackeray face off overMaharashtra Governor's Letter War Over .Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) · TwitterUddhav ThackerayUddhav Thackeray - WikipediaVideos and uddhav thackeray PhotosWhy is the state's reputation hanging on the gates of Delhiwill 'Matoshri' listen to Savitri's lamentations?
You might also like More from author
महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे बोगस…

महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच क्रमांक एकचा पक्ष होता…

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

कोरोना अपडेट

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – अमित देशमुख

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या…

महाराष्ट्र

खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार

पुणे

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या ४ हजार २२ घरांची सोडत

क्राईम

सुल्ली डिल्स अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा लिलाव; गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

कोरोना अपडेट

दिलासादायक! राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची…

महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ५०० चौरस फुटांची घरे मालमत्ता करमुक्त

कोरोना अपडेट

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

ग्रामीण भागातील रुग्णालयात लवकरच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन लावणार- राजेश…

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

राज्यातील ३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार,…

Jan 20, 2022

महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती आणि सत्तेचा गैरवापर, भाजपच…

Jan 19, 2022

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत…

Jan 14, 2022

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न…

Jan 13, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर