एन. चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेश, तसेच मोहनचरण माझी ओडिशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल चंद्रकांत पाटलांनी केले अभिनंदन
दिल्ली : तेलगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच पवनकल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांचा कार्यकाळ यशाने भरलेला जावो अशा शुभेच्छा देखील पाटील यांनी दिल्या.