‘आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्स घेतोय’, सुनावणी दरम्यान एनसीबीचा खुलासा

मुंबई: आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहेत. आर्यनला जामीन  मिळावा म्हणून त्याचे वकील न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. दरम्यान आर्यन खान अनेक वर्षांपासून ड्रग्स घेत आहे आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असं एनसीबीने न्यायालयाला सांगितले आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये देखील आर्यन ड्रग्सचं सेवन करत असल्याचं उघड झालं आहे. तर दुसरीकडे संपूर्ण बॉलिवूड शाहरुख खानच्या मदतीसाठी पुढे आलं आहे.

2 ऑक्टोबर रोजी  आर्यनला ड्रग्स केस प्रकरणी ताब्यात घेतलं. बुधवारी देखील आर्यन खान ड्रग्स प्रकरणी सुनावणी झाली. पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज आर्यन खान बद्दल काय  निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आर्यनच्या बेल वर आज सुनावणी सुरू आहे. आज 5 वाजेपर्यंत जर निर्णय आला नाही तर पुढील 5 दिवस कोर्ट बंद आहे.

दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बॅरेकमधून बाहेर काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले की आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोवीड रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.