पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई; एनसीबी पंच किरण गोसावीला अटक

4

पुणे: मुंबई क्रूझ ड्र्ग्स प्रकरणी शाहरुखनाचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे. मात्र या प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसतेय. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच किरण गोसावी यांना अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीने आत्मसमर्पण केलेले नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.

पंच प्रभाकर साईलच्या आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळण मिळाले आहे. साईलच्या आरोपांनंतर किरण गोसावी चर्चेत आले. आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी पंच आहे. गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती. पुणे पोलिसांचे पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झाले होते. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तपासासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.

फसवणूक प्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो आत्मसमर्पण करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचेही म्हटले जात होते. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनौ पोलिसांनी दिला होता.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.